दीर्घ विश्रांतीनंतर कासार सिरसी त फुलला आठवडी बाजार
कासार सिरसी:{प्रतिनिधी/फिरोज जागीरदार} दीर्घ विश्रांतीनंतर 72 गावात प्रसिद्ध असलेला कासार शिरशी चा आठवडी बाजार भरला त्यामुळे भाजी विक्रेत्यां सह लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून आता या व्यावसायिकांचे अर्थ चक्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने अनेक लघु उद्योजकांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीर्घ कालावधी पासून बंद असलेला येथील आठवडी बाजार आता पूर्व व त चालू झाला कोरोना चा अद्यापही धोका कायम असल्याने कासार सिरसी पोलिसांकडून आठवडा बाजारात गर्दी टाळण्यासाठी संपूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे येथील शिवाजी चौक बसस्थानक मार्ग या भागात पोलिसांच्या वतीने विक्रेत्यांसाठी रांगोळ्या आखून बैठी व्यवस्था करण्यात आली आहे परस्परात आंतर राखण्याच्या हेतूने बाजारात पोलीस बंदोबस्त तौनात करण्यात आला आहे विनाकारण फिरणे गर्दी करणे चेहरा पट्टी न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे पोलिसांचे आठवडी बाजारात शिस्तबद्ध नियोजनाचे नागरिकातून स्वागत करण्यात येत आहे.

0 Comments