"लातूर वृक्ष टिम" करणार औष्यात वृक्षारोपण
शेख बी जी.
औसा: दि.१३ - औसा शहरांमध्ये "लातूर वृक्ष टिम"कडुन 2000 वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पाला पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी औसेकर ही मदतीला येणार आहेत. सद्यस्थितीमध्ये ऑक्सीजन च्या कमी मुळे अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पर्जन्यमान कमी झाले आहे.या सर्व बाबीकडे लक्ष देऊन लातूर वृक्ष टिमने शहरात सर्वत्र वृक्षारोपण केले आहे.त्याच पद्धतीचा उपक्रम औसा शहरात राबवण्यासाठी लातूरचे नगरसेवक इम्रान सय्यद यांनी पुढाकार घेतला आहे. या कामासाठी मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे यांनी या टिम ला पाचारण केले आहे. श्रीशैल उटगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कार्यकर्त्यांसह लातूर वृक्ष टिम शहरात जागोजागी वृक्षारोपण करणार असल्याचे जाहीर केले आहे. यानुसार आज शहरात लातूर चे नगरसेवक इम्रान सय्यद यांनी वेगवेगळ्या ठिकाणची पाहणी केली व कोणत्या ठिकाणी वृक्षारोपण केले जाईल ते आज ठरवले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या वृक्षारोपणाने शहराचा कायापालट होईल अशी चर्चा शहरात आहे.
0 Comments