Latest News

6/recent/ticker-posts

माझं लातूर परिवारातर्फे मोफत ऑनलाईन योगा फिटनेस प्रशिक्षण शिबीर

माझं लातूर परिवारातर्फे मोफत ऑनलाईन योगा फिटनेस प्रशिक्षण शिबीर


प्रा. बी. जी. शेख

लातूर: माझं लातूर परिवार व रुरल अँड अर्बन योगा असोसिएशन, लातूर यांच्या सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे ऑनलाइन योगा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये खालील  काही आजारावर योगाद्वारे कसे निदान करता येईल यावर मार्गदर्शन केले जाणार हे मार्गदर्शन योगाचार्य ओंकार गादगे{MSc yoga therapy} हे करणार आहेत. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, लठ्ठपणा व मानसिक ताण-तणाव त्यासोबत एक तासिका एरोबिक्स, नृत्यावर आधारित झुंबा हा एक व्यायाम प्रकार याचे प्रशिक्षण ट्रॅडिशनल डान्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव बी. आनंदकुमार, प्रसिद्ध वेल्हनेस कोच व झुंबा प्रशिक्षिका झीन डॉली आनंद कुमार, लातूर जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकारी योग रत्न डॉ. मेजर मधुसूदन चेरेकर{ वैद्यकीय अधिकारी } विषय : योग ध्यान-साधना या विषयावरती विशेष मार्गदर्शन करणार, आहार-विहार दिनचर्या व ऋतुचर्या आयुर्वेदानुसार कशी असावी याविषयीचे मार्गदर्शन पतंजली योग विद्यालयाचे प्राध्यापिका सौ. संजिवणी सबनीस(आहार तज्ञ) हे प्रशिक्षण देणार आहेत. वरील विषयाचे ऑनलाईन प्रशिक्षण गुगल मीट द्वारा मंगळवार दिनांक 15 जून ते 21 जून 2021 पर्यंत होणार आहे. शिबिर यशस्वीरित्या पार करणाऱ्या शिबिरार्थींना मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेमार्फत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील असे या शिबीराचे संयोजक तथा माझं लातूर परिवाराचे संस्थापक सदस्य के वाय पटवेकर यांनी केले आहे. तरी इच्छुकाने मुक्त पत्रकार सतीश तांदळे: 9822992032 के वाय पटवेकर: 9270888587, दीपरत्न निलंगेकर: 7722075999, डॉ. सितम सोनवणे: 9270831750, अभय मिरजकर: 9923001824, ओंकार गादगे: 7385719005 यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments