उपजिल्हा रुग्णालयातील पेड्रट्रिक आय.सी.यु. ची आ.निलंगेकर कडून पाहणी
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगांमुळे देशासह महाराष्ट्र या आजारचा सामना करत आहे पहिली लाट झाली दुसरी लाट चालू आहे आता तिसरी लाट येणार आहे असे वर्तवले जात आहे विशेष म्हणजे तिसरी लाट लहान मुलांमध्ये येणार आहे त्या ? मुळे निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेऊन भाजपा युवा नेते अरविंदभैय्या पाटील निलंगेकर यांच्या 'संकल्पनेतून' उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पेड्रट्रिक (लहान मुलांचे) I.C.U वार्ड तयार करण्यात आले आहेकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा परिणाम हा लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याने याबाबत विशेष दक्षता म्हणून निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे महाराष्ट्र राज्य स्तरावरील ''सर्व सोयींनी युक्त विरंगुळ्याची साधने असलेला, शासकीय निर्देशाप्रमाणे बालकांसाठी विशेष अतिदक्षता वॉर्ड'' तयार करण्यात आला आहे. याची आज सोमवारी दि.14 रोजी माजी मंत्री व विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाहणी केली. याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी विकासजी माने, तहसिलदार गणेशजी जाधव, डॉ.प्रल्हाद सोळुंके , डॉ.खोसे , डॉ.मौला शेख ,भाग्यश्री काळे, यास्मिन मुल्ला , दाडगे , अंजुम सौदागर , जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.भारतबाई सोळुंके, माजी समाज कल्याण सभापती संजयजी दोरवे, चेअरमन दगडुजी सोळुंके , पांडुरंग नागिमे , जगतात दादा ,रामदास सोमवंशी ,लक्ष्मण फुलसुंदर , दत्तात्रय म्हेत्रे , शिवाजी वाघमारे , प्रदीप कदम , राहुल साळवे , राम जाधव , नरसिंग बोयने , अक्षय वाघमारे ,शिवाजी चव्हाण व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
0 Comments