Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र समिती नेमा- यश भिकाने

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र समिती नेमा- यश भिकाने


इरफान शेख

लातूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र समिती नेमा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख यश भिकाणे यांची शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्नील लोणकर नामक विद्यार्थ्यानी गळफास घेत आत्महत्या केली. ही ह्रदय हेलावून टाकणारी व अतिशय दुःखद बाब आहे.ह्या विद्यार्थाने 2019 वर्षी  राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा दिल्या त्याचा निकाल 28 जुलै,2020 रोजी लागला. तो विद्यार्थी पूर्व व मुख्य अशा दोन्हीही परीक्षेत  उत्तीर्ण झाला परंतु 2019 नंतर 2 वर्ष मुलाखत झाली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. शेकडो जागा रिक्त असताना दोन वर्षं फक्त मुलाखत रखडल्यामुळे विद्यार्थ्यांची भरती झाली नाही. ह्यामुळे विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपते त्याशिवाय त्यांच्या राहण्याचा,जेवणाचा,शैक्षणिक असा लाखो रुपयांचा खर्च येत असल्यामुळे पालक ही कर्जबाजारी होत आहेत परिणामी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य येत मानसिक खच्चीकरन होत आहे त्यातून ते असे पाऊल उचलत आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेत योग्य ते बदल करण्याकरिता स्वतंत्र समिती नेमावी अशी मागणी म.न.वि.से जिल्हाप्रसिद्धी प्रमुख यश भिकाणे यांनी केली आहे. तसेच त्यांना दिलेली स्वायत्तता जर विद्यार्थ्यांच्या जिव्हारी येत असेल तर त्यांची स्वायत्तता ताबडतोब रद्द करावी असे ही म्हटले आहे. मुळात तर इतकी बिकट परिस्थिती विद्यार्थी व पालकांवर येण्याचं कारण काय? ह्या परीक्षा वेळेच्या मर्यादित का झाल्या नाहीत?परीक्षेत उत्तीर्ण होऊन देखील वर्णी होत नसेल तर विद्यार्थ्यांनी करायचं काय? जर राज्यात 50,000 वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होऊ शकतात तर ह्या परीक्षा का नाही ज्यांना की वयोमर्यादेची अट आहे?त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत आता तरी सरकार ने कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे असे या निवेदनात नमूद केले आहे.ही घटना झाल्यानंतर मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात जाहीर केलं की उर्वरित रिक्त जागा 31 जुलै,2021 पर्यंत आम्ही भरू परंतु हा विषय ह्यावर्षी पुरताच मर्यादित नसून दर वर्षी हाच 'दिरंगाई चा खेळ' महाराष्ट्र लोकसेवा आयोग खेळत असतो. ह्या निवदनानंतर देखील जर स्वप्नील लोणकर सारख्या असंख्य विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ही या निवेदनात देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments