निलग्यांचे सुपुत्र गणेश रामदासी यांचा सोमवारी निलंगा येथे नागरी सत्कार
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा नगरीचे सुपुत्र गणेश श्रीधरराव रामदासी यांची महाराष्ट्र शासनाचे माहिती ( प्रशासन ) संचालक म्हणून मंत्रालय मुंबई येथे नियुक्ती झाल्यामुळे नगर परिषद निलंगा व निलंगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निलंगा येथे सोमवारी दि.१२ रोजी सकाळी ११ वाजता केतकी संगमेश्वर मंगल कार्यालय उदगीर मोड निलंगा येथे नागरी सत्कार ठेवण्यात आला आहे. हा सत्कार प्रसिध्द वक्ते , लेखक , निरूपणकार विवेक घळसासी यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे राहणार आहेत. प्रमुख पाहूणे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, जेष्ठ पत्रकार प्रदिप नणंदकर, जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे ( संपादक) आतला आवाज वार्षीकांक, भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, जेष्ठ सर्जन डॉ.हंसराज बाहेती, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने, जेष्ठ नेते लिंबन महाराज रेशमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, रिपाई आठवले गटाचे अंकुश ढेरे, रिपाईचे विलास सुर्यवंशी राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक अक्का फाऊंडेशन राहणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे अवाहन नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे व निलंगा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम काळगे यांनी केले आहे. हा कार्यक्रम अक्का फाऊंडेशनच्या व रागदरबारी फेसबुक पेजवर लाईव्ह पहाता येईल. Covid-19 च्या नियम पालन करत हा कार्यक्रम होणार आहे.

0 Comments