Latest News

6/recent/ticker-posts

पावसामुळे मदनसुरी ते कोकळगाव रस्त्यावरील पूल गेला वाहून

पावसामुळे मदनसुरी ते कोकळगाव रस्त्यावरील पूल गेला वाहून


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे निलंगा तालुक्यातील मदनसुरी ते कोकळगाव रस्त्यावर मदनसुरी ओढ्यावर असलेला पूल पूर्णतः वाहून गेल्याने  सदर रस्ता  वाहतुकीसाठी विस्कळीत  झालेला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने सदर ओढ्यावरील पूल वाहून गेला होता, मदनसुरीचे येथील लातूर जिल्हा शिवसेनाप्रमुख शिवाजी माने यांनी आमदार, खासदार, व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना पूल वाहून गेल्याची बाब निदर्शनास आणून दिली व ताबडतोब पुलाचे काम व्हावे अशी सूचना आमदार यांनी संबंधित अधिकारी यांना देऊनही रस्त्यावरील पुलाचे काम फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे करण्यात आले पण आजतागायत हा पुलाचे काम न झाल्याने पुन्हा एकदा पावसामुळे पूल वाहून गेलेला आहे. यामुळे कोकळगाव,कामलेवाडी,रामतीर्थ मुदगड एकोजी,नदी हत्तरगा इत्यादी गावाच्या लोकांना निलंगा या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच ओढ्याच्या पलीकडील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. मजबूत पक्क्या स्वरूपाचे पूल तयार करण्यात यावे अशी मागणी जनतेद्वारे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments