औसा तालुक्यात चांगल्या पावसाची दमदार एंट्री
बी डी उबाळे
औसा: तालुक्यांमध्ये गेल्या 20 जून 2021 पासून पाऊस पडला नाही त्यामुळे पिके करपून जात होती तर शेतकरी हवालदिल झाले होते,परंतु गेल्या दोन दिवसांपासून कमी-जास्त होत होत आज शनिवार दि 10 जुलै 2021 रोजी सकाळपासून चांगल्या पद्धतीने पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पिके चांगली डोलदार येणार यामुळे सध्या तरी पिकांना आवश्यक असणारा पाऊस चांगल्या पद्धतीने झाल्याची चर्चा औसा तालुक्यात असून त्यांना चांगल्या पद्धतीचे पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे पीक परिस्थिती चांगली सुधारेल अशी अपेक्षा असून यापुढेही अशीच मोठी पाऊस होणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. औसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरी हंगाम घेतला जातो यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा चरितार्थ हा केवळ खरीप हंगामावर अवलंबून असल्याने हा खरीप हंगाम चांगल्या पद्धतीने पीकला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढले पाहिजे अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. तर सध्या औसा तालुक्यातील अनेक ठिकाणी पाऊस नाही यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
0 Comments