Latest News

6/recent/ticker-posts

पक्षसंघटन मजबूत करा- जिल्हाप्रमुख शिवाजी माने

पक्षसंघटन मजबूत करा- जिल्हाप्रमुख शिवाजी माने


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) पक्षातील हेवेदावे बाजूला ठेवून शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून गावा गावामध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक तालुका प्रमुखांनी काम करावे असे मत जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी व्यक्त केले. लातूर, औसा व निलंगा विधानसभा या तीनही विधानसभेची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. या बैठकीत तिन्ही विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख, शहर प्रमुख,महिला आघाडी पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिनांक 12 ते 24 जुलै दरम्यान तिन्ही विधानसभेमध्ये शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक, बूथ प्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, उपतालुका प्रमुख व  विभाग प्रमुख अशी राहिलेली सर्व पदे भरून पक्ष संघटन वाढ वाढण्यासाठी प्रयत्न करणार असे मत जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी व्यक्त केले. निलंगा विधानसभेमध्ये प्रत्येक शिवसैनिक व प्रत्येक सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम करू असे मत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबन महाराज रेशमे यांनी व्यक्त केले. युवा सेनेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये शाखाप्रमुख, बूथ प्रमुखाची नेमनुक करुन  युवकाच्या माध्यमातून संघटन करून पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करू असे प्रतिपादन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अँड.राहुलजी मातोळकर यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून महिला आघाडी आपल्यासोबत काम करेल असे प्रतिपादन संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्या सौ.जयश्री ताई उटगे यानी व्यक्त केले. पक्षाने नवीन जिल्हा प्रमुख दिला असला तरीही मी त्याच उमेदीने नवीन जिल्हाप्रमुखासोबत काम करेन असे मत माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला लातूर, औसा व निलंगा विधानसभेतील उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शहरप्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, युवासेनेची अघाडी तसेच विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ साबदे, विनोद आर्य, शंकर रांजनकर तर तालुका तालुका प्रमुख म्हणून लातूरचे  बाबुराव शेळके, औस्याचे  सतीश शिंदे, निलंग्याचे अविनाश रेशमे,शिरुर अनंतपाळचे भागवत वंगे, देवनीचे पंडित भंडारी इत्यादी तालुकाप्रमुख उपस्थित होते. महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुनिता मामी चाळक, महिला आघाडीच्या तालुका संघटिका पुजारी मॅडम, तसेच संजय गांधी निराधार कमिटीच्या सदसया जयश्रीताई  उटगे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत वाजरवाडे, रवि नागरसोगे, सुनील नाईकवाडे ,प्रसाद मठपती, सतीश धायगुडे आकाश शिंदे लायकपाशा शेख इत्यादींनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments