चापोली येथे पदाधिकारांच्या निवडीबद्दल युवकांच्या वतीने सत्कार
चापोली: चाकूर तालुक्यातील चापोली येथे चापोलीसह परिसरातील युवकांची विविध पक्षांच्या जिल्हा तथा तालुका कार्यकारणीवर निवड झाल्यानुशंगाने चापोली येथील युवक रमेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर होनराव तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन बालाजी शेवाळे, उपसरपंच निसार देशमुख, सिराज देशमुख,माजी चेअरमन भाऊसाहेब होनराव,माजी उपसरपंच जिलानी शैख,ज्ञानेश्वर वाघमारे,लिंगायत महासंघाचे तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे,बाबा देशमुख,अँड.ओमकार शेट्टे,शिवाजी भिसे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य डॉ.पुंडलिक चाटे यांची काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हाउपाध्यक्षपदी तर सुरेश शेवाळे यांची मनसेच्या चाकूर तालुकाध्यक्षपदी, तसेच उमरगा येल्लादेवी येथील खंडेराव शेवाळे यांची काँग्रेस ओबीसी सेलच्या अहमदपुर तालुक्याध्यक्षपदी निवडी बद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आला.यादम्यान रमेश पाटील, सुभाष शंकरे,तुळशीदास माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बसवेश्वर मुर्गे,गोवर्धन मद्रेवार, बस्वराज होनराव,सिद्धेश्वर होनराव,तुळशीदास माने,चाँद शैख, माऊली चाटे,बालाजी कांबळे,संदीप आबंदे,कृष्णा होनराव,कपिल पाटील, मारुती पाटील,गजानन भिसे, निखिल होनराव,सोमेश धोंडापुरे,बाबाराव जाधव,आदीजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन व प्रास्तविक रमेश पाटील यांनी केले तर आभार माऊली चाटे यांनी केले.

0 Comments