Latest News

6/recent/ticker-posts

चाकुरातील शिबिरात १०१ जणांनी केले रक्तदान

चाकुरातील शिबिरात १०१ जणांनी केले रक्तदान



चाकुर:(
ता.प्र.सलीमभाई तांबोळी) ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा 'लोकमत'चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त चाकुरात शनिवारी आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०१ जणांनी रक्तदान केले.येथील नगरपंचायत सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन तब्बल १०६ वेळा रक्तदान केलेले विनायक भाऊराव पाटील यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे होते. यावेळी तहसीलदार डॉ. शिवानंद विडवे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, ग्रामीण रुग्णालया वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे उपस्थित होते. विलासराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन तैलंग, डॉ. संजय स्वामी, डी, आनंद मांजूरे, डॉ. एन.जी. मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शन, माजी सरपंच गंगाधरराव केराळे, सुधाकरराव लोहारे, नगरसेवक अँड. संतोष माने शिवकुमार सोनटक्के, नारायण बेजगमवार, सिध्देश्वर पवार, गौरीशंकर शेटे, माजी प्राचार्य शिवाजीराव नवरखेले, प्रा. बी.जी. पवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष शिवदर्शन स्वामी राजेश्वर डुमणे, ओमप्रकाश लोया, मधुकर कांबळे, दत्तात्रय वेबडे, सतीश गाडेकर, सलीम तांबोळी, माधवराव वाघ, समाधान जाधव, सागर डुमणे, मनीष अंकलकोटे, अजय धनेश्वर, अजित घंटेवाड, सचिन तोरे,बिलाल पठाण, तानाजी आरदवाड, पाराजी पुढेवाड, विवेक डुगणे, रामेश्वर सार्न, लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते. शिबिरास महिलांचाही प्रतिसाद मिळाला, महिला रक्तदात्यांसाठी न्यू मोडल इंग्लिश स्कूल येथे सोय करण्यात आली होती. प्रास्ताविक लोकमतचे तालुका वार्ताहर संदीप अंकलकोटे यांनी केले. आभार वार्ताहर यादव करडिले यांनी मानले. यशस्वीतेसाठी वाताहर भरतसिंह ठाकूर, बालानी पेन्सलवर संग्राम होनराव, अमोल शिंदे आदींनी परिश्रम घेतले. स्तसंकलनासाठी लातूर ब्लड बँकेचे नयन पाटील, डॉ. विलास खानापूरे, कृष्णा चाटे, सुशांत तिडके, सविता माळी अकिता गण माऊळी मुंडे, अजय आदेश बिराजदार आदींनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments