विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाचे आमदारांना साकडे

निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा शहरातील स्थानिक विविध मागण्यांचे निवेदन मुस्लिम सजमाजाच्या वतीने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना देण्यात आले. शहरातील हजरत निजामोद्दीन (रह.) यांच्या दरग्याचे सुशोभीकरणाचे काम आमदार निधीतून निधी देऊनही अद्याप सुरु झाले नाही अनेक वेळा मोजमाप घेण्यात आले पण कामास सुरुवात झाली नाही दोन वर्षांपूर्वी दरग्याची अवस्था खूपच खराब झाल्याने समाजातून वर्गणी करून डागडुगीचे काम युवकांनी केले होते. तसेच शिवाजीनगर भागातील काब्रिस्थान मध्ये नाल्याचे घाण पाणी जाऊन विटंबना होत असून आमदार निधीतून दोन नाल्या बांधण्याचीही मागणी करण्यात आली आहे संबंधित काब्रिस्थान मधील राहिलेले कामही पूर्ण करावे असा उल्लेख केला आहे. स्वतःहून लक्ष घालून 2 दिवसात काम सुरू करू व लवकरच पूर्ण करू असा शब्द आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला. यावेळी मुजीब सौदागर, फारुख सौदागर, नईम खतीब, मुस्तफा शेख, महेबूब शेख, डॉ जब्बार सौदागर, अय्युब शेख, हिरा खुरेशी, अमजत खुरेशी, अय्युब अत्तार, नवाब बागवान, शब्बीर बागवान, इस्माईल चौधरी, सिकंदर बागवान, अहेमद, बागवान, पाशा बागवान, राजूअप्पा रेवते, मुनिर बागवान, अहेमद खुरेशी, महेमुद अत्तार, सिराज मोमीन, पाशा शेख आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
0 Comments