नळेगाव येथील माजी सरपंचाचा विद्यमान सरपंचावर आरोप; प्रोसीडींग बुकावर खाडाखोड
नळेगाव:( प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे ) ग्रामपंचायतीच्या प्रोसीडींग बुकावर खाडाखोड करून अवैध मार्गांने देशी दारू दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप माजी सरपंच अनुसया भालेकर यांनी जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात केला आहे. माजी सरपंच अनुसया भालेकर या जुलै 2015 ते जुलै 2020 या काळात सरपंच पदावर कार्यरत होत्या. त्यांनी निवेदनात म्हटले कि, आपल्या सारपंचपदाच्या काळात 30 जानेवारी 2020 ला शेवटची ग्रामसभा झाली या ग्रामसभेच्या प्रोसीडींग मधील रिक्त जागेवर उभी रेष ओढून बंद केली होती. नंतर या प्रोसीडींगचा गैरवापर करून तत्कालीन ग्रामसेवक अमित रोकडे, सहायक गटविकास अधिकारी आकाश गोकनवार आणि विद्यमान सरपंच ताजोद्दीन घोरवाडे यांनी संगनमत करून रिक्त जागेवरील रेषेला खाडाखोड करून देशी दारू दुकानाच्या नाहरकत प्राणपत्राचा ठराव 1 जुलै 2021 ते 5 जुलै 2021 च्या दरम्यान लिहिला आहे. 30 जानेवारी 2020 च्या ग्रामसभेच्या विषय पत्रिकेवर देशी दारू दुकानाच्या नाहरकतीचा विषय नव्हता. त्या ग्रामसभेत कसलीही चर्चा झालेली नाही नाहरकतीचा ठरावही झालेला नाही. त्यामुळे हा ठराव बेकायदेशीर असून, कोणत्याही कार्यालयात ग्राह्य धरण्यात येऊ नये. शिवाय संबधितांना पदमुक्त करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

0 Comments