पक्ष मजबुत करण्यासाठी कार्यकर्तेनी काम करावे- अॅड बाबासाहेब गायकवाड
चाकुर: (ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर तालुका अनुसुचीत जाती विभाग बैठक चाकुर शहरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी बाबासाहेब गायकवाड भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अनुसुचित जाती विभाग, माजी समाज कल्याण सभापती लातुर, शेख हुसेन पप्पुभाई शहर अध्यक्ष चाकुर,सुनिल दांडगे तालुका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग व्यासपीठावर उपस्थिती होते. कार्यक्रमांचे प्रस्ताविक सुनिल दांडगे यांनी केले.चाकुर तालुक्यात गावा येथे शाखा व घर येथे कॉग्रेस पक्षाचा कार्यकर्ते अभियान राबविण्यांचा संकल्प केला.माझी निवड झाल्यपासुन तालुक्यात हा पहिलाचा कार्यक्रम आहे.पुढील काळात कॉग्रेस पक्षाची विचारधारा तळाघाळातील लोकांपर्यत पोहचावणार आहे.जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांनी आपले विचार मांडताना ते म्हणाले कॉग्रेस पक्षाला त्याग व बलीदांनाचा इतिहास आहे.देशाला योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी कॉग्रेस पक्ष हाच पर्याय आहे.मागसप्रर्गाचे आरक्षण आपल्या कॉग्रेस पक्षानेच दिले आहेत.शिवाराज पाटील चाकुरकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आम्ही पक्षात काम करत आहोत.आमचे आदर्श शिवाराज पाटील चाकुरकर आहेत.अनेक क्रांतीकारी निर्णय पक्षाने घेतले आहेत.अन्न सुरक्षा कायदा करुन सर्वसामान्य पर्यंत राशन पोहचविण्यांचा निर्णय घेतला. अनुसुचित जाती विभाग राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या सुचने प्रमाणे प्रत्येक गावात कॉग्रेस मिञ म्हणून दोन कार्यकर्तेची निवड करा.केंद्रातील मोदी सरकार मागासर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याच्या तैयारीत आहे.सर्वच स्तारावरील सामाजिक आरक्षण रद्द करुन केंद्र सरकार समान नागरी कायदा आणण्यांचा विचारात आहे. असा थेट आरोप त्यांनी केंद्र सरकारावर केला. यावेळी चाकुर तालुक्यात पक्ष वाढीसाठी नवीन पदधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आले. यामध्ये संगमेश्वर कसबे,सत्यवान शिंदे,महेश खरटमोल,प्रकाश पाटोळे,पद्माकर कसबे,यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली.शिवनखेड येथील सरपंच नामदेव सांळुके यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी प्रमुख उपस्थिती गंगाधर केराळे,भागवत फुले,विजय धनेश्वर,बाळु इरवाने,अनिल महालिंगे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमांचे सुञ संचलन कॉग्रेस पक्षाचे सोशल मिडिया प्रमुख सलीमभाई तांबोळी यांनी केले.आभार शेख हुसेन पप्पुभाई यांनी मानले.चाकुर शहरासह तालुक्यातुन असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments