Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुक्यातील सावनगीरच्या संदिप सोमवंशीला अमेरिकेची फेलोशिप

निलंगा तालुक्यातील सावनगीरच्या संदिप सोमवंशीला अमेरिकेची फेलोशिप


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) अमेरिकेतील पर्डयू युनिव्हर्सिटी व भारत सरकारच्या विज्ञान व तंञज्ञान विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्टरला फेलोशिपसाठी (दोन हजार डॉलर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी संदीप बालाजी सोमवंशी यांची निवड झाली. या फेलोशिपसाठी भारतातुन फक्त 25 संशोधकांची निवड झाली आहे. जुन 2021 ते जुले 2022 दरम्यान एक वर्षासाठी त्यांची निवड होणे ही गौरवाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता नाही. आशी टीका केली जाते पण संदीपने टीकाकारांना आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे. याच विद्यापीठात केलेल्या संशोधनाच्या आधारे त्याला एक वर्षासाठी अमेरिकेत अँडव्हान्स रिसर्चची संधी प्राप्त झाली आहे. भारतीय विद्यापीठांमधील संशोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाचा अनुभव यावा म्हणुन भारत-अमेरिका संशोधनाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेतील पर्डयू युनव्हर्सिटी व भारत सरकारच्या विज्ञान व तंञज्ञान विभागात त्यासाठी शैक्षणिक करार झाला आहे. अँडव्हान्स बायोसेन्सरची निर्मिती, चाचणी आणि त्यांचा वैधतवर उपयुक्त असे संशोधन करण्यासाठी संदीप अमेरिकेला गेला आहे. संदिपने शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा सावनगीरा व संस्कार विद्यालयातुन तर देवगिरी महाविधालयातुन पदवीचे शिक्षण पुर्ण केले. विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातुन एम. एस्सी. फिजिक्स झाल्यानंतर सध्या तो डॉ. के. एम जाधव सर यांच्या मार्गदर्शनात पीएचडी करत आहे. अतिसूक्ष्म चुंबकीय पदर्थाची निर्मिती त्यांच्या विविध गुणधर्माची तपसाणी व त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्करोगासारख्या आजारावर वेदनाविरहित व अचुक रोगनिवारण, यावर संदीप संशोधन करत आहे. सायन्स स्टँड-अप बँटल स्पर्धेत अव्वल या संशोधनासाठी त्याला भारत सरकारच्या विज्ञान व तंञज्ञान विभागातर्फे प्रतिष्ठित अशी डीएसटी इन्सपायर फेलोशिप मिळाली आहे. गतवर्षी रशियात झालेल्या पाचव्या ब्रिक्स युवा वैज्ञानिक संमेलनातील सायन्स स्टँड-अप बँटल या स्पर्धेत त्याने प्रथम पारितोषिक मिळवले होते. तसेच जर्मनिच्या लिंडाऊ येथे त्यांने 69 व्या नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या परिषेदेमध्ये युवा वैज्ञानिक म्हणुन सामील होण्याचा बहुमान मिळवला होता.

Post a Comment

0 Comments