Latest News

6/recent/ticker-posts

मुळाचे मातीशी घट्ट असलेले नाते

संजय जेवरीकर(ज्येष्ठ पत्रकार) यांच्या लेखणीतून...

मुळाचे मातीशी घट्ट असलेले नाते 


मातीशी नातं घट्ट असलं की मुळांचं वाढण कोणीही थांबवू शकत नाही..हल्ली आमचं जगणंच वरवरचं झालं आहे..मातीशी घट्ट नात असायला हवं ही भावनाच मुळात संपत चालली आहे..वरवरच्या आयुष्यात आनंद मानायला सुरू झाल्याने,खोलात जाण्याची प्रक्रिया थांबत चालली आहे..क्षणिक सुखासाठी आम्ही मातीतल्या बागा विसरून गेलो आणि कुंडीतल्या बागेवर, गॅलरीतल्या बागेवर आम्ही समाधान मानायला लागलो..मुलांवरच्या संस्काराच्या व्याख्याही बदलल्या, त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावर दिसू लागला..नात्याची जी वीण होती तीही आता।घट्ट न राहता वरवरची दिसायला लागली..नुसतं रफू करून आम्ही समाधानाची ऊब शोधायला लागलो..आपण जे बीज पेरतो ते घट्ट मातीत रुजले तर त्याच्या मुळा खोलात जातील यावरचा विश्वास आपला उडाला म्हणून जगण्याच्या सगळ्या तऱ्हामध्ये आपण मूळ संकल्पनेलाच मूठमाती देत सुटलो..हे झाड त्याचंच एक प्रतीक आहे..त्यांनीही त्याच मातीतील रुजण संपवून आपली बैठक वरवरची करून घेतली आहे..शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी आता संपत आली आहेत,आम्ही निसर्गाने दिलेल्या नियमाला कधीच हरताळ पाळला असल्याने वर्षोनुवर्षे वाट पाहत आलेल्या फळांचा आनंद आम्ही हिरावून टाकलाय..पपई, आंबा आता घरच्या धान्यात,पाचटात पिकवण्याचे दिवस संपले आहेत..

मुळाचे मातीशी घट्ट असलेले नाते टिकवून ठेवाल तर वरपांगी जगण्याने होणारे दुःख संपून जाईल आणिएक वेगळा आनंद मिळेल..


@ संजय जेवरीकर( ज्येष्ठ पत्रकार )

Post a Comment

0 Comments