Latest News

6/recent/ticker-posts

केळगाव मध्ये साजरा केला नागरिकांनी झाडांचा वाढदिवस

केळगाव मध्ये साजरा केला नागरिकांनी झाडांचा वाढदिवस


निलंगा तालुक्यातील केळगाव येथे आज सोमवारी बकावली येथील दर्गा परिसरामध्ये मागच्या वर्षी गावातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक एकनाथ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त 5 जुलै 2020 रोजी केळगाव येथील अवकाश बकाश वली दर्ग्यामध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात आले होते यावेळी ओढ व कडुलिंब अशी विविध झाडे लावण्यात आली होती. त्या लावण्यात आलेल्या झाडाला वर्षभर पाणी घालून संगोपन केल्यानंतर आज पाच जुलै दोन हजार एकोणवीस वर सोमवारी पूर्ण एक वर्ष झाल्याने ज्येष्ठ नागरिक एकनाथ चव्हाण यांनी वडाच्या झाडाला पुलाचा हार घालून त्याचा वाढदिवस साजरा केला. दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत चालली आहे व ऑक्सिजनची कमतरता मानवाला जाणवत आहे यासाठी मानवाने झाडावर प्रेम करून झाडांची जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन गावचे ज्येष्ठ नागरिक एकनाथ चव्हाण यांनी केले यावेळी गावातील नागरिक यावेळी झाडांच्या वाढदिवसासाठी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments