भाजपाच्या 12 आमदाराचे निलंबनाच्या निषेधार्थ आघाडी सरकारच्या विरोधात निलंगा येथे निदर्शने
निलंगा:(तालूका प्रतिनिधी/इरफान शेख) महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत कमी कालावधीचे विधिमंडळाचे दोन दिवसाचे अधिवेशन होत आहे ही लोकशाहीची क्रूर थट्टा आणि हत्या करणारी सरकारची कृती आहे महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभाराची पोल-खोल होऊ नये यासाठी कालावधी कमी केला असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जनतेचे न्याय हक्काचे प्रश्न मांडत असताना जाणीवपूर्वक भाजपाच्या 12 आमदाराचे निलंबन करून लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला या प्रकाराच्या निषेधार्थ आज मंगळवारी निलंगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने करून आमदारांना निलंबित करणाऱ्या विधानसभेतील हंगामी सभापती भास्कर जाधव यांचा जाहीर निषेध करण्यात आले व त्वरित 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित शाहूराज थेटे तालुकाध्यक्ष , सौ भारत बाई सोळुंके उपाध्यक्ष जि प लातूर , दगडू जी सोळुंके , माजी सभापती अजित माने , वीरभद्र स्वामी शहराध्यक्ष , बाळासाहेब पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष , युवराज पवार, कूमोद लोभे, शफीक सौदागर , तुकाराम माळी, संजय हलगरकर,राजा पाटील, उत्तम मामा लासूने, वामन राव भालके, जिलानी बागवान,रवी फुलारी, सुमित इन्नानी, तम्मा माडीबौने, प्रशांत पाटील,सुरेश बिराजदार , मनोज पवार, नागेश पाटील, अर्जुन पोळ, सचिन गायकवाड,काळे साहेब, उजळे, सुरेश बिराजदार, शिवपुत्र आग्रे, बंडगर मारोती, रज्जाक रकसाळे ,अविनाश बिराजदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments