लिंगायत समाज शांत आहे म्हणजे तो दुबळा आहे असे कोणी समजू नये- प्रा सुदर्शनराव बिरादार
चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) महाराष्ट्रातील लिंगायत समाजाचा स्वभाव हा शांत व संयमी आहे आमच्या शांत स्वभावाला कोणी दुबळा समजू नये असे मत लिंगायत महासंघाचे प्रांतअध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार यांनी चाकूर येथे झालेल्या लिंगायत महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले लिंगायत समाज हा अतिशय शांत आहे म्हणून त्याच्यावर काही मंडळी अन्याय करत आहेत मात्र शंभू महादेव ही शांत असतात त्यांचा तिसरा डोळा उघडल्यावर भलेभले जळून खाक होतात त्या शंभू महादेवाचे आम्ही भक्त आहोत आम्ही कोणीही कोणत्याही पक्षात काम करत असू कोणत्याही संघटनेत काम करत असु आम्ही सगळे एकच आहोत. आमच्या समाजाचा कोणी अपमान करत असेल तर तो सहन केला जाणार नाही असेही त्यांनी समाजविरोधकांना ठणकावले समाजानी सर्व पक्षाला मदत केली. पण राज्यकर्त्यानी आम्हाला सन्मान दिला नाही. यापुढे लिंगायत समाजाला सन्मान न देणा-या राज्यकर्त्यांना समाज धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही हे पुढा-यांनी लक्षात ठेवावे. लिंगायत महासंघ चाकुर तालुक्यातील प्रत्येक समाज बांधवांपर्यंत संपर्क करणार आहे. लिंगायत समाजाच्या प्रश्नाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे लिंगायत समाजाच्या समाज बांधवास सन्मानाची वागणूक द्यावी अन्यथा आपणास आपली जागा दाखवण्यास लिंगायत समाज समर्थ आहे यावेळी लिंगायत आरक्षणावर प्रा सुदर्शनराव बिरादार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले या बैठकीला लिंगायत महासंघाचे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ जट्टे, मुअ पटणे, धीरज माकणे, आदींनी मार्गदर्शन केले या बैठकीसाठी अहमदपूर तालुका अध्यक्ष महेश भिंगोले, चाकुर तालुका अध्यक्ष सुभाष शंकरे, लातूर शहर युवक अध्यक्ष विजय खिंडे, यांच्यासह चाकूर तालुक्यातील विजयकुमार हंडरगुळे,बालाजी गंदगे उपसरपंच वडवळ, संजय बोळेगावे, सरकाळे ,रामेगावे सुगावकर, उपाध्यक्ष वाडकर धिरज माकणे सांगवे गुरुजी, सिद्धेवर पाटील तीर्थवाडीकर, योगीराज स्वामी यांच्यासह अनेक समाज बांधव यावेळी उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचलन प्रास्ताविक लिंगायत महासंघाचे तालुकाध्यक्ष सुभाष शंकर गुरुजी यांनी तर आभार धुप्पे यांनी मानले.

0 Comments