Latest News

6/recent/ticker-posts

शासकीय रुग्णालयातील बंद असलेल्या शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करा- डॉ नरसिंह भिकाणे

शासकीय रुग्णालयातील बंद असलेल्या शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करा- डॉ नरसिंह भिकाणे


लातुर:( इरफान/शेख ) गेली वर्षभरापासून कोविड महामारी मुळे लातूर जिल्ह्यातील सर्व उपजिल्हारुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग बंद आहेत तरी आता जिल्हाभरात कोविड रुग्णसंख्या फार कमी झाली असल्यामुळे गोरगरिबांसाठी अत्यावश्यक असलेला शस्त्रक्रिया विभाग पूर्ववत सुरू करावा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.,लक्ष्मण देशमुख यांच्याकडे केली आहे.कुटुंब नियोजन, गर्भाशय थैली काढणे,हायड्रोसील,हर्निया आदी गरजेच्या परंतु अत्यावश्यक सेवेत सामील नसलेल्या तसेच सिझेरियन शस्त्रक्रिया ही बंद आहेत ज्या जिल्हाभरात रोज शेकडोंच्या घरात शासकीय रुग्णालयात मोफत होत होत्या.अश्या शस्त्रक्रिया ह्या गरीब रुग्णांना मजबुरीने असल्या बेरोजगारी च्या काळात 25 ते 30 हजार रुपये खर्चून खाजगी रुग्णालयात कराव्या लागत आहेत.वर्षभरापासून असे रुग्ण शासकीय रुग्णालयात खेटे घालत आहेत परंतु कोविड च्या नावाखाली त्यांना परत पाठवले जात आहे जेव्हा की सद्यस्थितीत जिल्हाभरात अत्यल्प म्हणजे फक्त 25 ते 30 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आता तरी या गरजू व गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयानी न्याय द्यावा व उपासमारीच्या काळात त्यांना जीवितासाठी खाजगी रुग्णालयांच्या आर्थिक पिळवनूकीपासून वाचवावे असेही डॉ भिकाणे म्हणाले. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांना शस्त्रक्रिया विभाग चालू करण्याविषयी जिल्हाशल्यचिकित्सक यांनी त्वरित आदेश काढावा अन्यथा जिल्हाभर शासकीय रुग्णालयासमोर रुग्णांना सोबत घेऊन बोंबाबोंब आंदोलन करु असा इशाराही डॉ भिकाणे यांना केली आहे.

Post a Comment

0 Comments