दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे दुःखद निधन
मुंबई:(प्रतिनिधी) दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन. इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिऊन ते 98 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांची पत्नी सायरा बानू म्हणाल्या होत्या की ते बरे होऊन लवकरच घरी परत येतील. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर आली होती. परंतु, आज सकाळी त्यांचे निधन झाले. दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांनी ज्वार भाटा (1944), अंदाज (1949), आन (1952), देवदास (1955), आजाद (1955), मुगल-ए-आजम (1960), गंगा जमुना (1961), क्रान्ति (1981), कर्मा (1986) आणि सौदागर (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पद्मभूषण व दादासाहेब पुरस्काराने सन्मानित सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना 8 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टेचा सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 2015 मध्ये सरकारने त्यांना पद्मभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च सन्मानही दिला. लहानापासून थोरापर्यंत अनेक जण दिलीप कुमार यांचे फॅन होते. यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टी मधील एक हिरा निखळला. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

0 Comments