जाकीर सामाजिक विकास संस्थेने वाचवले वानराचे प्राण
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) येथील जाकीर सामाजिक विकास संस्था अंतर्गत जनहित स्वच्छता अभियान टीमने आज निलंगा तालुक्यातील शिंदी जवळगा शिवारामध्ये तिने दिवसापूर्वी एका वानराला कुत्र्याने त्याच्या मांडीला हाताला पूर्णपणे चावा घेतला होता त्यामध्ये तो जखमी अवस्थेत विव्हळत पडला होता.
ही माहिती जाकीर विकास संस्थेचे जाकीर शेख यांना संपर्क करून सांगितले असता बुधवारी सकाळी शिंदी जवळगा येथे जाऊन तीन दिवसापासून जखमी अवस्थेत पडलेल्या वानराला डॉक्टर मुळे यांच्या सहकार्याने त्या जखमी वानरावर औषध उपचार करण्यात आले. व स्थानिक शेतकऱ्या जवळ निगराणी मध्ये ठेवण्यात आले आहे. यावेळी जाकीर शेख, आकाश शिंदे व गावातील शेतकरी बांधव या सर्वांनी मिळून या वानराला जीवन दान दिली आहे.
0 Comments