कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापिका हनिफाबेगम सेवानिवृत्त
शेख बी जी
औसा:दि.८ औसा तालुक्यातील जि प प्रशाला समदर्गा येथील मुख्याध्यापिका हानिफा बेगम या सेवानिवृत्त झाल्या. विद्यार्थीप्रिय,कर्तव्यनिष्ठ, उपक्रमशील शिक्षिका म्हणून नावलौकिक प्राप्त करणाऱ्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी चोख काम केले. औसा येथील चक्रधर शाळेमध्ये मित्रपरिवार,शिक्षक वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवावृत्तीचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती अर्चनाताई गायकवाड यांच्या हास्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस अमर खानापुरे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी निवृत्ती जाधव हे होते. शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे, केंद्रप्रमुख शारआली, संजय जगताप, देशमाने,शाम भोसले,बोयणे आदि उपस्थित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना पतीने मोठ्या मोलाची साथ दिली. पती शब्बीरभाई शेख, मुले यांच्या साहाय्य लाभल्याने शाळेत भरपूर वेळ देता आला व यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती साधता आली असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक समदर्गा शाळेचे शिक्षक नवनाथ मेढे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक डोंगरे यांनी केले. आभार चक्रधर शाळेचे मुख्याध्यापक शेख सुलतान यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चक्रधर शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
0 Comments