Latest News

6/recent/ticker-posts

सरपंच सेवा महासंघाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी पंकज शेळके

सरपंच सेवा महासंघाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी पंकज शेळके


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील राठोडा गावचे सरपंच पंकज मारुतीराव शेळके यांची  सरपंच सेवा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. सरपंच सेवा संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे ,कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे , राज्य संपर्कप्रमुख राहुल उके ,विभागीय अध्यक्ष कल्याण साबळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पंकज शेळके यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील नावाडे होते यावेळी उपस्थित शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशव गंभीरे संदीप पुणेकर , पंचायत समिती सदस्य महेश देशमुख ,शिवाजीराव पाटील ,मोहन माळी ,किशोर टोंपे ,अभय पोळ , सरपंच विठ्ठल पाटील ,धनराज पाटील ,बालाजी शेळके आदी जण उपस्थित होते. प्रास्ताविक उत्तमराव शेळके यांनी केले व सूत्रसंचालन ऍड.तिरुपती शिंदे यांनी केले या निवडीबद्दल सर्वच स्तरातून सरपंच पंकज शेळके याचे स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments