जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी आगामी काळात आक्रमक भुमिका घेणार- राज्य सरचिटणीस सचिन चव्हाण
लातुर येथील राज्यस्तरीय बैठकीत संघटनेने घेतला निर्णय
लातूर:( प्रतिनिधी ) २००५ नंतर नियुक्त कर्मचार्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारुन नवीन अंशदायी पेन्शन योजना, त्यानंतर राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली ही योजना म्हणजे कर्मचार्यांचे भविष्य अंधारात टाकणार्या योजना असून ही योजना बंद करुन पूर्वीचीच १९८२ ची जुनी पेन्शन योजना कर्मचार्यांना लागू झाली पाहिजे यासाठी आगामी काळात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलने केली जातील. अशी घोषणा राज्याध्यक्ष शिवराम घोती यांनी लातूर येथील राज्यस्तरीय चिंतन शिबीरात केली. लातूर येथील पञकार भवन येथे संघटनेच्या राज्य पदाधिकारी, तसेच राज्यातील विभागीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी यांचे चिंतन शिबीर दिनांक १२ जुलै रोजी घेण्यात आले. या शिबीराच्या अध्यक्षपदी राज्याध्यक्ष शिवराम घोती, राज्य सरचिटणीस सचीन चव्हाण, राज्य उपाध्यक्ष शशीकांत पाटील, राज्य सल्लागार तेजराम बांगडकर, राज्य कोषाध्यक्ष गजानन टांगले, विश्वस्त महेशककुमार तांदळे इत्यादी उपस्थीत होते. यावेळी राज्याध्यक्ष शिवराम घोती म्हणाले की, शासनाने 1 नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नोकरीत लागलेल्या कर्मचार्यांवर अन्यायकारक असणारी शेअरबाजारावर आधारीत पेन्शन योजना आणली आहे. ही योजना अन्यायकारक आहे. कर्मचा-यांचे भविष्य अंधारात घेवून जाणारी ही योजना आहे, त्यामुळे ही अन्यायकारक योजना बंद करुन पूर्वीचीच जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाला भाग पाडण्यासाठी आगामी काळात राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलने केली जातील,अशी घोषणा शिवराम घोती यांनी केली. यावेळी राज्यातील नवीन पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र दिल्या गेले. यावेळी लातूर जिल्हाध्यक्षपदी हणमंत केंद्रे, औरंगाबाद विभाग अध्यक्षपदी ईस्माईल शेख, नागपूर विभागीय अध्यक्षपदी यशवंत कातरे, उपाध्यक्षपदी प्रवीण भोगे, जिल्हा कोषाध्यक्षपदी केशवानंद बमनोटे, नागपूर शहराध्यक्षपदी देविदास ईटनकर, नागपूर शहरसचीव देविदास येलुरे, पूणे जिल्हाध्यक्षपदी बाबुलाल मनुरे, नांदेड जिल्हाध्यक्षपदी नंदू पाटील, औरंगाबाद विभाग कार्याध्यक्षपदी ईस्माईल शेख, नाशिक विभाग अध्यक्षपदी मनोज भालेराव, गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी रोशन थोरात, जळगाव जिल्हाध्यक्षपदी अजय पाटील, लातूर तालुकाध्यक्षपदी मतीन अब्बास, जिल्हाप्रतीनिधी राजेश्वर अंबेगावे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी राहूल बचाटे, यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी सुनिल चव्हाण, जिल्हा सचिवपदी श्रीनिवास चव्हाण, वाशिम जिल्हाध्यक्षपदी रमेश पडवाल, तर जळकोट तालुकाध्यक्षपदी गणेश मरेवाड यांची नियुक्ती केली. या कार्यक्रमांचे सूञसंचलन हणमंत केंद्रे यांनी तर आभार महेश कुमार तांदळे यांनी मानले. यावेळी राज्यभरातील मोठयाप्रमाणावर पदाधिकारी उपस्थीत होते.
0 Comments