Latest News

6/recent/ticker-posts

पिक विमा संरक्षण घेण्यासाठी 15 जूलै पर्यंत अंतिम मुदत

पिक विमा संरक्षण घेण्यासाठी 15 जूलै पर्यंत अंतिम मुदत 


लातूर:(जिमाका) दि. 12 - प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 20 21अंतर्गत पिक विमा संरक्षण घेणे करिता अंतिम मुदत 15 जुलै 2021 असून शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. अंतिम टप्प्यात गर्दी होऊन विमा संरक्षण यापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेता व कोविंड पार्श्वभूमी पाहता गर्दी टाळून विहित मुदतीत 15 जुलै पूर्वी आपले पिक विमा हप्ता भरून विमा संरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्र किंवा VLE किंवा नजीकची बँक शाखा हे पर्याय उपलब्ध असून याद्वारे विमा हप्ता भरून पिक विमा संरक्षण घेता येईल. योजनेबाबत अधिक माहिती करिता नजीकचे कृषी विभाग कार्यालय किंवा बँक शाखा किंवा पिक विमा संकेतस्थळ यांना भेट देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले पीक विमा संरक्षित करावे असेही प्रसिध्दी प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

Post a Comment

0 Comments