Latest News

6/recent/ticker-posts

निलंग्याचे भूमिपुत्र गणेश रामदासी यांचा निलंगा येथे मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार

निलंग्याचे भूमिपुत्र गणेश रामदासी यांचा निलंगा येथे मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार



निलंगा
:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुका पत्रकार संघ, निलंगा नगरपरिषद यांच्या पुढाकाराने व अक्का फाउंडेशनच्या वतीने निलंग्याचे भूमिपुत्र गणेश रामदासी यांची महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल केतकी संगमेश्वर मंगल कार्यालय, औराद रोड निलंगा येथे मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पालकमंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रदीपजी नणंदकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे न.पा. घोणे, जयप्रकाश दगडे, महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, डॉ.हंसराज बाहेती, विलास सूर्यवंशी, निलंगा तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम काळगे, पोलीस अधिकारी ,दिनेश कोल्हे, अंकूश ढेरे, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्यासमवेत ऑनलाईन माध्यमातून निरुपणकार व ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी व आदी मान्यवरांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व महासंचालनालयाचे संचालक म्हणून गणेश रामदासी यांची झालेली निवड ही संपूर्ण निलंगा वासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कार्यातून निलंग्याची शान, मान आणि गौरव वृद्धिंगत होणार आहे यात शंका नाही. तसेच त्यांच्या माध्यमातून अनेक पत्रकारांच्या समस्या मार्गी लागेल असा विश्वास आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments