वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मदत करा- कोविड योद्धा सुरवसे संकेत
कोविड योद्धा संकेत सुरवसे चा वाढदिवस रुग्णांसोबत साजरा
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) उपजिल्हा रुग्णालय निलंगा येते कार्यरत असलेले कोविड योद्धा संकेत सुरवसे यांनी आज दि.12 रोजी आपला वाढदिवस उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसोबत निलंगा राईस वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच बस स्टँड निलंगा येते ही निलंगा राईस वाटप करण्यात आले. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या तत्वावर चालणारे संकेत सुरवसे म्हणाले मी मागील एक वर्षांपासून कोविड बाधित रुग्णांची सेवा अहोरात्र करत आहे. कोरोनासारख्या महामारीचे संकट आपल्या देशावर महाराष्ट्रावर उभे आहे कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या व्यापार सुळलीत चालू नाही काही जणांना उपासमारीची वेळ आली आहे लॉकडॉऊन असतांना रुग्णांचे व नातेवाईकांचे हाल फार जवळून मी पाहिले आहे तरी आपण सर्वांना एक आवाहन करू इच्छितो आपण आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गोर गरिबांना मदत करा असे आवाहन कोविड योद्धा संकेत सुरवसे यांनी " मराठी अस्मितेचा इशारा वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी " बोलताना केले. यावेळी उपस्थित श्रीमती डॉ.तेजश्री बंडगर , डॉ.आश्लेषा सोळुंके , श्रीमती अरुणा सोनार , भाग्यश्री काळे , यास्मिन मुल्ला , सुरेख माने , अंजुम सौदागर , बोराडे , मोनिका पांढरे ,प्रीती लोंढे , निंबाळकर , कोकाटे , मीना ढगे , कदम पुजा ,कांबळे ,आळंदकर , मीना उसनाळे , रामदास सोमवंशी , सुमित क्षीरसागर , पांडुरंग नागिमे , लक्ष्मण फुलसुंदर , इरफान शेख , दत्तात्रय म्हेत्रे ,अर्जुन कुमठे ,सुमित भोसले , परमेश्वर श्रीमंगले ,नरसिंग बोयने ,अतिक शेख , गोपाळ जाधव , प्रदीप कदम , राम जाधव , राहुल साळवे ,शिवाजी वाघमारे , आशिष माने , मदार अलगुडे , शिवाजी चव्हाण व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी व संकेत सुरवसे मित्र परिवार उपस्थित होता.
0 Comments