Latest News

6/recent/ticker-posts

राठोडा ते केळगाव चार किलोमीटरचा रस्त्यात पडलेले खड्डेच-खड्डे

राठोडा ते केळगाव चार किलोमीटरचा रस्त्यात पडलेले खड्डेच-खड्डे


केळगाव:{ प्रतिनिधी/वसीम मुजावर } निलंगा तालुक्यातील राठोडा ते केळगाव चार किलोमीटरचा अंतराचा रस्ता खड्डेमय झाल्याने खड्ड्यात पाणीच पाणी साचले आहे त्यामुळे वाहतुकीसाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मागील आठ दिवसांपासून पावसाच्या सरी चालूच आहे त्यामुळे राठोडा ते केळगाव अशा चार किलोमीटरच्या अंतराच्या रस्त्यात हजारो खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे यामुळे वाहनधारकांना वाहतूक करत असताना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्याने जायचे म्हटले तर खूप व अडचण ठरत आहे या पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने गाडी चालवताना अंगावर चिखल व पाणी येत असून अनेक वेळा वाहने चालवत असताना चांगलीच झुक-झुक गाडी झाल्याचा भास होत आहे. लवकरात लवकर प्रशासनाने या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याकडे लक्ष देऊन खड्डे दुरुस्ती करावी अशी मागणी राठोडा व केळगाव ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.


Post a Comment

0 Comments