Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथे खास ग्रामसभेमध्ये दारूबंदी व मटका,गुटखा,वाळू बंदी बाबत ठराव

भादा येथे खास ग्रामसभेमध्ये दारूबंदी व मटका,गुटखा,वाळू बंदी बाबत ठराव 


बी डी उबाळे

औसा: औसा तालुक्यातील भादा गाव येथे खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेमध्ये दि 13 जुलै 2021 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता सरपंच मिनाबाई दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली खास ग्रामसभा हरिहर मंदिर सभागृह भादा येथे बोलावण्यात आली होती. दिनांक  12 जुलै रोजी भादा येथील हरिहर मंदिरामध्ये महिलांची खास ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यामध्ये गावातील संपूर्ण दारूबंदी, मटका बंदी बाबत एकमताने ठराव घेण्यात आला होता. 


त्यानंतर दिनांक 13 जुलै रोजी ग्रामसभा बोलावण्यात आली होती यामध्ये सभेचे कोरम पूर्तता केल्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. या गावात दारूबंदी व मटका बंदी करण्या बाबत मौजे भादा गावात अवैध दारूविक्री होत आहे. मटका, जुगार, पत्ते ,गुटखा ,गांजा विक्री, वाळू इत्यादी अवैध विक्री होत आहे, त्यामुळे गावातील नागरिक महिला अबालवृद्ध यांना खूप त्रास होत आहे.यावर सभेत चर्चा होऊन या गावात दारूबंदी मटका बंदी बंदी गुटखाबंदी गांजा बंदी वाळू बंदी करण्यात यावे असे सर्वानुमते ठरले व हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला या ठरावास साठी सूचक अक्षय उबाळे तर अनुमोदन म्हणून बी एम शिंदे यांनी दिले.गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments