दारुबंदी साठी दावतपुरकर यांनी दारू विक्रेत्याच्या घराला घातला घेराव;पोलिसांची बघ्यांची भुमिका
शेख बी जी
औसा:दि.१५ - तालुक्यातील दावतपूर गावामध्ये अवैधरित्या पाच सहा जण दारु विकत आहेत.दारू विकल्यामुळे गावातील तरुण मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत. गावामध्ये भांडण-तंटे यामध्ये वाढ झाली आहे. गावा शेजारी शाळा असल्यामुळे शाळेमध्ये जावून दारु पिणारे नागरिक रिकाम्या बाटल्या तिथेच टाकत आहेत. कोरोना संकटामुळे शाळा बंद आहेत. शाळेमध्ये अनेक ठिकाणी रिकाम्या पडलेल्या बाटल्या ठिकठिकाणी दिसत आहेत. अनेकवेळा पोलिसांना दारु विक्रेत्यांचे नाव सांगूनही कारवाई करायला लावली. पण थातूर-मातूर कलम लावून दारु विक्रेत्यांना सोडून दिले. परंतु आज दावतपूर येथील शेकडो नागरिकांनी दारु विक्रेत्यांच्या घरावर जावून दारु बंद करा अन्यथा कारवाई करण्यात येईल. असे नागरिकांनी सांगितले दारु मुळे गावामध्ये चौकातून जाणाऱ्या महिलेला जाता येत नाही. कारण चौकामध्ये दारु पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अवैध दारु विक्री करणाऱ्यांना नागरिकांनी चांगली तंबी दिली पून्हा दारू विक्री करु नका असे सुचक विधान करण्यात आले. यावेळी सरपंच विठ्ठल बेडजवळगे पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार तंटामुक्त अध्यक्ष उमाकांत पाटिल, मधुकर लांडगे, मुक्तेश्वर बेडजवळगे भगवान लांडगे, विजू बेडजवळगे, महादेव बिराजदार, बब्रुवान दाने,शिवदास कांबळे, अण्णासाहेब कांबळे सुदाम कुंभार ,राम बेडजवळगे ,सुरेश आप्पा बिराजदार ,राम बिराजदार आदी सह शेकडो नागरीक उपस्थित होते.
0 Comments