Latest News

6/recent/ticker-posts

कासार सिरसी येथे महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने राज्यव्यापी 'स्वाक्षरी मोहीम'

कासार सिरसी येथे महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने राज्यव्यापी 'स्वाक्षरी मोहीम'


मदनसुरी:(प्रतिनिधी/ द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील कासार सिरसी येथे युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील बळीराजा पेट्रोल पंप येथे. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर टोंपे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल,गॅस व महागाई विरोधातराज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे अजय कोकणे , सुभाष माने,गणेश विहीरे,विजय पाटील, शिवलिंग डांगे , मनोज शिंदे,गणेश बिराजदार, ज्योतीबा गंगथडे , विनय इंगळे,आनंद जाधव, प्रशांत मुगळे, गणेश माने, विठ्ठल पौळ, नितीन पाटील, काकासाहेब डिग्गे,प्रविण कोकणे, गोविंद पौळ अभिजित मुगळे,शुभम मोरे,रंजीत गायकवाड, इत्यादींनी  उपस्थिती होती.युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष किशोर टोंपे म्हणाले,अच्छे दिन चे स्वप्न अंमलात आणू म्हणणाऱ्या केंद्र सरकारने महागाईचा कळस निर्माण करून सामान्य जनतेच्या  जीवनात  महागाईचा उद्रेक निर्माण केलेला असून, विविध वस्तूच्या महागाईने सामान्य गोरगरीब जनता त्रस्त झालेली आहे.केंद्र शासनाच्या या धोरणामुळे गरिबांच्या स्वयंपाकातील फोडणी सुद्धा महाग झाल्याने गरिबी विरोधातील सरकार असल्याचे म्हंटले आहे.

Post a Comment

0 Comments