निलंगा शहरात 28 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई; साडे सात हजाराचा दंड वसूल
या पथकात दंतशल्यचिकिस्तक डॉ. कोडगी, जिल्हा सल्लागार डॉ.माधुरी उटीकर, निलंगा येथील पोलीस अधिकारी कर्मचारी श्री.एच. एस. पडिले, एस. एस. शिंदे, तसेच श्री फुलसुंदर उ. जि. रु. निलंगा. श्री.प्रकाश बेम्बरे श्रीमती.संध्या शेडोळे , श्री. अनिल कुंभारे हे उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यास अथवा धूम्रपान केल्याने कोरोंना , क्षयरोग व स्वाईनफ्ल्यु सारख्या संसर्गजन्य आजारांच्या संक्रमणाचा धोका वाढतो. याबाबीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्था तसेच शासकीय कार्यालयाच्या परिसरात कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे ज्यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण करणार्यांवर जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी कोटपा 2003 कायद्याची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.



0 Comments