ननंद येथे शिवसंपर्क अभियनास जनतेचा प्रचंड प्रतिसाद
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) ननंद येथे शिवसंपर्क अभियानाला उत्सफुर्त प्रतीसाद मिळाला. लातुर जिल्ह्यातील प्रत्येक शासन स्तरावरील गावातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व शासन योजना मिळवुन देण्यासाठी शिवसेना सर्वोतोपरी मदत करणार व लोकांना शिवसेनेच्या दिलेल्या वचनपुर्तीचा मान राखन्याचे काम जिल्ह्यातील शिवसेना करणार असल्याचे आजच्या ननंद येथील शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने हे बोलत होते. या शिवसंपर्क अभियानात जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने , उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, तालुका प्रमुख अविनाश रेशमे,तालुकासंघटक शिवचरण पाटील, हरिभाऊ सगरे,ईश्वर पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख अँड. राहुल मातोळकर , युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे व तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, याची उपस्थिती होती. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियान राबवून सर्व शिवसैनिकांनी शासकीय योजनेचा लाभ गोरगरीब जनतेपर्यंत पर्यंत पोहचतविण्यासाठी व अडीअडचणी मध्ये मदत करण्यासाठी एकत्रित राहून, संपर्कात राहून मदत करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी संपर्कात राहावे यासाठीच शिवसंपर्क अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात राबवावे व सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील शाखाप्रमुख सहित जिल्हाप्रमुखा पर्यंत सर्वांनी एकत्रित येऊन व संपर्कात राहून पक्षवाढ करण्याचे आदेश दिले होते. यासाठी आज ननंद येथे शिवसंपर्क अभियानाची बैठक आयोजित केली होती. येथील बैठकीला ननंद येथील जनतेने व पदाधिकाऱ्यांनी उत्सफुर्तपणे प्रतीसाद दिला व गावातील विकास कामांच्या अडीअडचणी बोलुन दाखविल्या. आम्हाला वेळोवेळी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी लागणारी मदत व विकासकामांसाठी पाठपुरावे करणे गरजेचं असल्याचे या बैठकीत नागरीकांनी बोलुन दाखविले. यावर आजच्या बैठकीसाठी आलेले लातुर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने , उपजिल्हा प्रमुख व संगायो समिती सदस्य विनोद आर्य , तालुका प्रमुख अविनाशजी रेशमे यांनी गावपातळीवरील निराधार लोकांना मदत , गाव विकास कामांसाठी लागणारी तालुका , जिल्हा पातळीवरील सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व तसे प्रस्ताव प्रत्येक शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी संबंधित सर्व कार्यालयात पाठविण्यासाठी पुढाकार घ्यावे व अडीअडचणी आल्या तर आम्हाला संपर्क करा आम्ही तात्काळ मदत करुन ते कामे पुर्ण करुन घेण्यासाठी तत्पर मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात जुने शिवसैनिक तानाजी पाटील शिवाजी दिवे, अरविंद ऊस्तुरे, शिवाजी इंडे, राजकुमार तांबाळे इत्यादी ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी लादे, माजी चेअरमन नामदेव म्हेत्रे, निळकंठ लादे, सुलेमान पटेल, सिद्धेश्वर लादे, उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी, राजकुमार पाटील इत्यादी ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या. ननंद येथील शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी अमोल मिरगाळे,बालाजी नारायणपुरे, व्यंकट पाटील, विलास माळी, उद्धव जाधव, राम लादे, सतीश लादे, राजकुमार तांबाळे, कुमार लादे, अभय मिरगाळे, अजय कांबळे, गोविंद वाघमारे, अविनाश कांबळे, सागर स्वामी, आप्पा पालापुरे, बळवंत कांबळे, सतीश लादे,हासीम पटेल, रवि कस्तुरे, श्रीकांत बेलकुंदे, शिवा डांगे व युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवगिर गिरी तर आभार प्रदर्शन अभय मिरगाळे यांनी मानले.

0 Comments