Latest News

6/recent/ticker-posts

केळगाव जिल्हा परिषद शाळेच्या बाला उपक्रमाची केंद्रप्रमुख पवार बी.एन. यांनी केली पाहणी

केळगाव जिल्हा परिषद शाळेच्या बाला उपक्रमाची केंद्रप्रमुख पवार बी.एन. यांनी केली पाहणी


केळगाव:( प्रतिनिधी/वसीम मुजावर ) बाला उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळगाव येथे  रंगरंगोटीचे कार्य शिक्षक व गावकऱ्यांच्या सहकार्यातून होत आहे. बाला उपक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक घटकाचा अध्यापनात  उपयोग करायचा आहे त्यासंबंधाने ॲम्पी थेटर निर्मिती, उंची नुसार फलक, शब्द भिंत, सूर्यमाला ,साप सीडी ,लुडो, गांडूळ खत निर्मिती, ऑक्सीजन पार्क, सौर घड्याळ, दिनदर्शिका, बायोगॅस निर्मिती ,वॉटर हार्वेस्टिंग, लपंडाव भिंत, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम ,समाज सहभाग इत्यादी शंभर गुणासाठी शाळांचे मूल्यांकन होणार आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील पाचशे शाळांची निवड करण्यात आली आहे त्यापैकी निलंगा तालुक्यात 60 शाळा गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी आहेत. सचिन डोईजोडे सर साधन व्यक्ती व  केंद्रप्रमुख पवार यांच्या पथकाने केळगाव शाळेचे  मूल्यांकन करून समाधान व्यक्त केले.. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भंडारे, चांभारगे, गोंदगे , शेंद्रे सर , मुरमे , पांचाळ सर , तांबोळी , राठोड , मोमीन मॅडम, सय्यद मॅडम , काळगापूरे  मॅडम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments