Latest News

6/recent/ticker-posts

बाकली शिवारात जाणारा शेत रस्ता पावसाच्या पाण्यात गेला वाहून

बाकली शिवारात जाणारा शेत रस्ता पावसाच्या पाण्यात गेला वाहून


केळगाव:( प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील मांजरवाडी बस्पूर बाकली शिवारामध्ये काल सायंकाळी चार वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवारात सर्वत्र पाणीच पाणी दिसून आले नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे अनेक शेत रस्ते हे पाण्याखाली गेली तर माचरटवाडी मार्गे बाकलीला जाणारा शेत पाणंद रस्ता पाण्याच्या पुरामुळे वाहून गेला आहे. यामुळे रस्त्याच्या पलिकडे असणारे काही शेतकरी अनेक तास तेथेच थांबून प्रवाहाचे कमी होण्याची वाट बघत होते. मागील अनेक दिवसापासून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी राजाला आज झालेल्या पावसामुळे समाधान व्यक्त झाली आहे मागील दोन दिवसापासून हलक्‍या पावसाची रिपरिप सुरू होती मात्र आज झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकरी बांधव समाधानी झाला आहे. मात्र आजच्या पावसामुळे अनेक शेतातील बांध तुटून गेले तर काही ठिकाणी पेरलेल्या जमिनीचे माती वाहून गेली आहे यामुळे शेतकऱ्याला फटका बसला आहे.

Post a Comment

0 Comments