Latest News

6/recent/ticker-posts

आधुनिक शेतीला अतिवृष्टीचा तडाखा; टोकण पद्धतीच्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्याने फिरविला नांगर

आधुनिक शेतीला अतिवृष्टीचा तडाखा; टोकण पद्धतीच्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्याने फिरविला नांगर


निलंगा
:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) गेल्या आठवड्यामध्ये निलंगा तालुक्यास अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले तालुक्यातीलच मसलगा येथील तुळशीदास किसनराव साळुंके या शेतकऱ्यांनी कृषी जिल्हा अधिक्षक दत्तात्रय गावसाने यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने टोकण करून अडीच एकर जमिनीमध्ये सोयाबीन लागवड केली पिक चांगले बहराची आले होते परंतु गेल्या आठवड्यात अचानक झालेल्या जोरदार अतिवृष्टीने या पिकांमध्ये पाणी शिरल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडले व शेतकऱ्याच्या हातातून पिक गेल्याने तुळशीदास किसन साळुंके यांनी आपल्या सोयाबीनच्या पिकावर चक्क नांगर फिरवला आहे. अतिवृष्टीने झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांच्याकडे या शेतकऱ्यांनी केली आहे. यांच्यासह मसलगा येथिल अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.

Post a Comment

0 Comments