Latest News

6/recent/ticker-posts

लातूर ग्रामीणचे आ धीरज देशमुख यांच्याकडे केली भादा ग्रामपंचायतीने विकासासाठी निधी मंजुरीची मागणी

लातूर ग्रामीणचे आ धीरज देशमुख यांच्याकडे केली भादा ग्रामपंचायतीने विकासासाठी निधी मंजुरीची मागणी


औसा
: औसा तालुक्यातील लातूर ग्रामीणचे धीरज देशमुख हे गुरुवार दिनांक 22 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता भादा तालुका औसा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते. भादा हे गाव असून या गावाची लोकसंख्या जवळपास 8 हजार असून येथील नागरिकांच्या मागणीनुसार जन सुविधेसाठी पुढील प्रमाणे कामांना मंजुरी देण्यात यावी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करणे,भादा वरवडा ,भादा- शिवली रस्ता डांबरीकरण करणेभादा- शिंदेवाडी उटी रस्ता डांबरीकरण करणे,प्रत्येक वस्तीसाठी ओपन जिम मंजूर करणे,भादा गावासाठी नवीन पाणीपुरवठा टाकी मंजूर करणेबौद्ध विहार नवीन समाज मंदिर मंजूर करणे,मनरेगाअंतर्गत वाढीव सिंचन विहीर मंजुरी देणे ,प्रधानमंत्री,रमाई आवास ,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना गावासाठी मंजूर करणे, बौद्ध समाजासाठी स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत मंजूर करणेबाबत,भादा येथील प्रत्येक चौकांमध्ये सर्व शौचालय बांधकाम मंजूर करणे, भादा येथील शेतकऱ्यासाठी वाढीव नवीन विद्युत डीपी मंजूर करणे, येथील जोड रस्‍ता मजबूतीकरण व डांबरीकरण मंजूर करणे भागा कोरंगळा रस्‍ता मजबूतीकरण व डांबरीकरण करून भादा गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी नाली मंजुरी करणे अशी सर्व गाव विकासाची कामे पूर्णपणे मंजूर करण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्याकडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून निवेदन सादर करण्यात आले,यावर परंतु आ धीरज देशमुख कोणती भूमिका या मागणीवर घेतील याकडे आता भादेकराचे लक्ष वेधले आहे.

Post a Comment

0 Comments