निटूर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील परिसरात मुरूम टाकून उंची वाढवा- सुरेंद्र धुमाळ
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील निटुर येथील भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील परिसरात नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या वाढलेल्या उंचीमुळे व इतर भागाची उंची वाढल्यामुळे परिसरातील सर्व पाणी त्याठिकाणी एकत्र जमा होत असल्याने सदरील पुतळ्या शेजारील परिसरात मुरूम टाकून उंची वाढवावी व बेड काँक्रेट दलित वस्ती सुधार योजनेतून करण्यात यावे अश्या मागण्यांचे निवेदन लातूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी व समाज कल्याण सभापती वाघमारे यांना देण्यात आले या प्रसंगी उपस्थित सुरेन्द्र धुमाळ ,माजी बांधकाम सभापती कल्याण पाटील नंदकुमार हसबे, बासिद गस्ते, बळी मदाळे, सुदाम साळुंखे आदी जण उपस्थित होते.

0 Comments