Latest News

6/recent/ticker-posts

हाशमी सय्यद सिद्दीक़ यांच्या मृत्यूपश्चात शोकसभेचे आयोजन

हाशमी सय्यद सिद्दीक़ यांच्या मृत्यूपश्चात शोकसभेचे आयोजन


उदगीर: येथील अल-अमीन एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष हाशमी सय्यद सिद्दीक़ साहेब यांचे हृदय विकाराने अकस्मात मृत्यू झाले. ही दुःखद बातमी फक्त अल-अमीन एज्युकेशन सोसायटीसाठीच नाहीतर साऱ्या शहरासाठी दुःखात बुडवणारी आहे. हाश्मी सिद्दीक़ साहेबांचे संपर्क व संबंध शहरातील सार्‍या समाजबांधवांशी अतिशय प्रेम व आपुलकीचे होते. अल-अमीन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारणीतर्फे त्यांच्या मृत्यूपश्चात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. 15 जुलै रोजी आयोजित शोकसभेत संस्थेच्या सर्व सदस्यांनी आपल्या दुखी भावना व्यक्त केल्या. शोकसभा कु़रेशी ख्वाजा मोईनुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. आपल्या शोक संदेशात हाशमी सय्यद सलीम यांनी बोलताना हाशमी सय्यद सिद्दीक़ साहेबांच्या मनमिळाऊ स्वभावाचा उल्लेख केला. शेख क़यामोद्दीन यांनी त्यांच्यासोबत केलेल्या कामाच्या आठवणी व संस्थेसाठी त्यांनी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ईसा खान यांनी आपल्या शोक संदेशात सिद्दीक़ साहेबांशी आपुलकी व प्रेमाविषयी भावना व्यक्त केल्या. संस्थेचे सचिव शेख अकबर यांनी सिद्दीक़ साहेबांशी बालपणापासून असलेल्या जवळिकीचा व संस्थेसाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांच्या मृत्यू मुळे निर्माण झालेली दुःखाची दरी भरून काढणे अशक्य असल्याचेही सांगितले. क़ुरेशी ख्वाजा मोईनोद्दीन यांनी हाशमी सय्यद सिद्दीक़ साहेबांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करत त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी प्रार्थना केली.

Post a Comment

0 Comments