Latest News

6/recent/ticker-posts

कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने तात्काळ भूमिका घ्यावी- कुटुंब पुनर्वसन समिती

कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने तात्काळ भूमिका घ्यावी- कुटुंब पुनर्वसन समिती


कासार शिरसी:( प्रतिनिधी/फिरोज जागीरदार ) कोरोना मुळे अनेक व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये अनेक ५० वर्षांच्या आतील पुरुषांचे मृत्यू  झाल्याने मुलांच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरवल्यामुळे, त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी ही महिलांवर आली आहे. म्हणून अशा महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी असे निवेदन निलंगा तालुका तहसीलदार यांना कोरोना कुटुंब पुनर्वसन समिती निलंगा तालुका यांच्या वतीने देण्यात आले. तसेच निलंगा तालुका गटविकास अधीकारी यांना ही निवेदन देण्यात आले. कोरोनाने ५० वर्षाच्या आतील पुरुषांच्या मृत्यूमुळे ५० वर्षाच्या आतील वय असलेल्या किमान २०,००० महिला महाराष्ट्रात विधवा व निराधार झाल्या आहेत. या महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने राज्य स्तरीय धोरण जाहीर करावे या मागणीसाठी व त्यांचा मदतीसाठी महाराष्ट्र स्तरावर ‘कोरोना कुटुंब पुनर्वसन समिती’ स्थापन झाली असून १५० पेक्षा जास्त संस्था त्यात एकत्रित आल्या आहेत. निलंगा तालुक्यात सुद्धा सदरील समिती कार्यरत आहे. शासनाच्या वतीने कुटुंबात कोरोनामुळे मृत्यू पावला असेल तर अशा कुटुंबासाठी मदत करण्याचे जाहीर केले आहे, परंतु अद्यापपर्यंत प्रत्यक्ष मदत मिळाली नाही, परंतु प्रक्रिया चालू आहे असे समजते. आज या महामारीमुळे निराधार झालेल्या महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी निलंगा तालुका समिती यांच्या वतीने वरील प्रमुख मागणीसह पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. महिलांचे मालमत्तेवरील हक्क डावलले जाणार नाहीत, यासाठी तातडीने आदेश काढावेत.,  तातडीच्या आर्थिक मदतीबरोबरच या महिला आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी त्यांना विविध प्रशिक्षण देणे व उद्योग उभारणीसाठी अल्पव्याजदराने कर्ज पुरवठा करणे. , शासकीय नियुक्तीत अशा महिलांना प्राधान्यक्रम द्यावा तसेच रेशनमधील अंत्योदय योजनेत त्यांचा समावेश करावा. १५ व्या वित्त आयोगातून ग्राम पंचायत स्तरावर महिलांसाठी असलेला निधी या महिलांसाठी खर्च करणे, अनुसूचित जाती-जमातीच्या निधीतून त्या संवर्गातील अशा महिलांसाठी ती रक्कम खर्च करण्याचे आदेश द्यावेत. , विधवा निराधार पेन्शन योजनेत या सर्व विधवांचा तातडीने समावेश करावा., विधवा महिलेच्या पतीच्या नावे असलेली व सासरा किंवा भाव्या,दिर ह्यांच्या नावावर एकत्र कुंटुब पध्दतीने असलेली स्थावर व जंगम मालमत्ता विधवांच्या नांवे करण्यासाठी तहसीलदारांना आदेशित करण्यात यावे., बालसंगोपन योजनेत या महिलांची मुले ज्या शाळेत शिकतात त्या शाळांनी ते फॉर्म भरून घेण्याचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना आदेश द्यावेत इत्यादी मागण्या त्यात केल्या आहेत. सदरील निवेदनावर राम पवार, फिरोज जागीरदार, नसीम तांबोळी, अकबर रइस, मौला पटेल यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments