Latest News

6/recent/ticker-posts

हसलगण येथे जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न,किल्लारी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद

हसलगण येथे जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न,किल्लारी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील हसलगन गावातील काही व्यक्तीकडून  जातिय वाचक शिव्या देऊन कोयत्याने जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. हसलगन-मातोळा पाणी फिल्टर टाकि समोर विनापरवाना देशी दारू विक्रीचे हॉटेल असुन आरोपी सुहास पाटील, सागर पाटील, नानासाहेब पाटील, अन्ना पाटील या चौघांनीही संगनमताने अमित त्र्यंबक सोनवते यास दिन 21 जुलै 2021रोजी फोन करून बोलावून घेऊन आमच्या हाॅटेलची 300 रूपये उधारी कधी देणार म्हणुन विचारत, जातीवाचक शब्द उच्चारून तुमची ऐपत नाही पैसे द्यायची तर ऊधारी कशाला करता असे बोलुन शिव्या दिल्याा. तुझी एवढी हिम्मत वाढली काय रे असे म्हणुन सर्वानी मिळून हातपाय धरून कोयत्याने मारहाण केली व सर्व जन पळुन गेले. जखमी अवस्थेत पडलेल्या आमितचा मावस भाऊ समाधान मांजरे यांना ही घटना समजताच त्यांनी या जखमी अवस्थेत अमितला घेउन किल्लारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता किल्लारी पोलीस ठाण्यातून जखमींवर उपचारार्थ मातोळा या ठिकाणी पाठवण्यात आले. परंतु मातोळा आरोग्य केंद्रात तात्पुरता इलाज करून औसा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगीतले. औसा येथील शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यास सुरुवात केली परंतु उपचार चालु असताना अमितला उलट्या चालु झाल्यावर तेथील डाॅक्टर यांनी लातूरला हलविण्यास सांगीतले असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments