Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा पोलीस प्रशासनाचे शहरात पथ संचलन

निलंगा पोलीस प्रशासनाचे शहरात पथ संचलन


निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) आगामी २१ जुलै २०२१ बुधवार रोजी देशभरात साजरी होणाऱ्या ईद अल-अज़हा च्या पार्श्वभूमीवर निलंगा पोलिस प्रशासन तर्फे शुक्रवारी शहरात रंगीत तालीम (पथ संचलन) घेण्यात आले. निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निजामोद्दीन चौक जुने पोलीस ठाण्यापर्यंत पोलीस दलातर्फे सशस्त्र संचलन करण्यात आला. या पथ संचलनात निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल चोरमले, पीएसआय गोविंद राठोड,पीएसआय प्रणिता गायकवाड,गोपनीय शाखेचे प्रणव काळे,बाळासाहेब नागमोडे, यांच्या सह पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments