सावनगीरा युवक काँग्रेस तर्फ सरपंच सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष पंकज दादा शेळके यांचा सत्कार
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील राठोडा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य पंकज मारुतीराव शेळके यांची लातूर जिल्हा सरपंच सेवा महासंघाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सावनगिरा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज शुक्रवारी निलंगा येथे पंकज दादा शेळके यांच्या निवासस्थानी भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित रामदास सोमवंशी , विशाल दादा सोळुंके ,आकाश सोळुंके ,दयानंद सोळुंके ,पवन पाटील , इरफान शेख आदी जण उपस्थित होते.

0 Comments