शिवसंपर्क अभियानास प्रारंभ
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) शिवसंपर्क अभियानास निलंगा तालुक्यामध्ये प्रचंड उत्साहात सुरुवात करण्यात आली.पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान होत आहे. त्या अनुषंगाने शिवसेना गावोगावी, गावातल्या प्रत्येक घरात शिवसैनिक तयार करण्याचा निर्धार करून आज दिनांक १५/०७/२०२१ रोजी लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी निलंगा तालुक्यातील हाडगा येथे युवा सेना शाखेचे उदघाटन करून नवीन शिवसैनिकांना शिवसेनेत सामील करून त्यांना गावामध्ये घर तिथे शिवसैनिक या स्वरूपाने काम करण्यासाठी मार्गदर्शन केले. हाडगा, लांबोटा, आंबुलगा, हलगरा येथे सर्व नेत्यांनी मार्गदर्शन केले. सोबत जिल्हा महिला संघटक डॉ. शोभताई बेंजरगे, लिंबन महाराज रेशमे जिल्हा नियोजन समिती सदस्य, माजी जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमे, लातूर जिल्ह्याचे युवासेना संपर्क प्रमुख सुरजजी दामरे सर, उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, जिल्हायुवाअधिकारी अँड. राहुल मातोळकर, तालुका संघटक शिवचरण पाटील, ईश्वर पाटील, हरिभाऊ सगरे,लातूर उपजिल्हायुवाअधिकारी प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, तालुका युवाअधिकारी प्रशांत वांजरवाडे, तालुका महिला संघटक रेखाताई पुजारी,शाखा प्रमुख गणेश होगाडे, उपशाखा प्रमुख देवानंद दरेकर, शाखा संघटक कलीन शेख, शाखा उपसंघटक ओमकार बिराजदार, व इतर सदस्य या सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित होते. हाडगा येथील शाखेचे उदघाटन तसेच युवासेना शाखेचे अनावरण करून तिथे शिवसेना वाढवण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी शिवसैनिकांना केले.

0 Comments