Latest News

6/recent/ticker-posts

औसा मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात आ. पवार यांची केन्द्रीय मंत्री गडकरींशी चर्चा

औसा मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात आ. पवार यांची केन्द्रीय मंत्री गडकरींशी चर्चा


बी डी उबाळे

औसा: आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामासंदर्भात यावेळी चर्चा झाली यासह मतदारसंघातील प्रस्तावित केलेल्या रस्त्यांना डिसेंबर महिन्यात केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी गडकरी यांनी आश्वस्त केले आहे. तसेच औसा शहराला बायपास रोड तयार करण्यासाठी अभ्यास करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग ऑथॉरिटी यांना दिल्या असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले. सुरत - मुंबई - पुणे - सोलापूर - हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सुरत - अहमदनगर कॉरिडॉर ला विस्तारित करून अहमदनगर - जामखेड - खर्डा - भूम - बार्शी - उस्मानाबाद - शिवली - औसा - निलंगा - भालकी - बिदर - जाहिराबाद रस्त्याला ४/६ पदरी प्रमुख एनएच कॉरिडॉर म्हणून घोषित व विकसित करण्यात यावे तसेच उस्मानाबाद - शिवली - औसा - लामजना - निलंगा या घोषित राष्ट्रीय महामार्गाला क्रमांक देऊन सदर रस्त्याचे काम करण्यात यावे, लातूर - उमरगा/लातूर - तुळजापूर रोडवरील अवजड वाहतूक औसा शहराबाहेर वळवण्यासाठी औसा शहरासाठी बायपास रोड निर्माण करण्यात यावा, औसा - लामजना - किल्लारी - उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील साईड पट्यांचे काम करण्यात यावे तसेच औसा मतदारसंघातील ११ वेगवेगळ्या रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत निधी मंजूर करावा अशी विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. नितीन गडकरी यांनी उपरोक्त राष्ट्रीय महामार्गाच्या ४/६ पदरीकरणासह विकासासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे व मतदारसंघातील प्रस्तावित केलेल्या रस्त्यांना डिसेंबर महिन्यात केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी आश्वस्त केले आहे.तसेच औसा शहराला बायपास रोड तयार करण्यासाठी अभ्यास करण्याच्या सूचना नॅशनल हायवे ऑथॉरिटी यांना दिल्या असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments