रावण गुजरगे(कुंभार) यांचे दुःखद निधन
निटूर: निलंगा तालुक्यातील निटूर येथील रावण तुकाराम गुंजरगे(कुंभार) हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालय येथे ऍडमिट केले असता रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर निटुर येथे दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. निटूर परिसरात रावण(मामा) कुंभार या नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

0 Comments