Latest News

6/recent/ticker-posts

पत्रकारावरील हल्ले खपवून घेणार नाही- समाधानताई माने

पत्रकारावरील हल्ले खपवून घेणार नाही-  समाधानताई माने


निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, विरोधात आवाज उठवणाऱ्या  लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर विनाकारण जर हल्ले होत असतील तर हल्ले करणार्यांवर व हल्ले घडवून आणणाऱ्याना आम्ही वेळीच त्याची जागा दाखवून देऊ असा कडक इशारा महाराष्ट्र दारूबंदी जनआंदोलन समितीच्या महीला अध्यक्षा समाधानताई माने यांनी दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 26 जुलै रोजी कोकळगाव येथील एका वृत्तपत्राचे पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांच्यावर अवैध धंद्याची बातमी लावल्याच्या अनुशंगाने अज्ञात व्यक्तींनी बेरात्री त्यांच्या घरावर दगडफेक करून गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणीचे निवेदन जिजाऊ ब्रिगेड लातूर व महाराष्ट्र दारूबंदी जनआंदोलन समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक लातूर यांना देण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. गावा-गावात अवैध धंद्याचे साम्राज्य वाढले असून या अवैध धंद्याचा सर्वात जास्त त्रास जर कोणाला होत असेल तर ते म्हणजे महिलांनाच. आज डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात महिला सुरक्षित नाहीत, महिलांवरील अत्याचार, बलात्कार, आत्महत्या याचे प्रमाण वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे गावा-गावातील अवैध धंदे. जर गावा-गावात सर्वानुमते ग्राम रक्षक दल स्थापन केले तर अवैध धंद्यांना चाप बसेल असा विश्वास त्यांनी लातूर येथे 'मराठी अस्मितेचा इशारा' शी बोलताना व्यक्त केले आणि तसे नाही झाले तर येत्या काही काळात गावा-गावात आमच्या संघटनेच्या शाखा फक्त आणि फक्त अन्याय, अत्याचाराच्या विरोधात उभे केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Post a Comment

0 Comments