केळगाव महामार्गावर रस्ता दुभाजक व फुटपाथ बनवण्यासाठी ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनेचे निवेदन
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यातील नवीन होत असलेल्या लातूर ते जहीराबाद महामार्गाची कामे अंतिम टप्प्यात सुरू असून या महामार्गावर अतिशय लहान लहान गावी असलेले गौर, आनंदवाडी, निटूर(मोड), म्हसोबावाडी, हंगरगा या गावचा रस्ता दुभाजक व फुटपाथ नाल्याची काम झाले आहे परंतु केळगाव येथे पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात चार शिक्षण संस्था असून पंचायत समिती गण आहे व विद्यार्थ्यांचा लोंढा केळगाव येथे नेहमी असतो परंतु अद्याप या गावाला फुटपाट रस्ता दुभाजक याची सोय झाली नाही यामुळे केळगाव या सुविधेपासून वंचित राहत आहे. महामार्ग बनवणारी कंपनी केळगाव येथे असून केळगाव परिसरातील खनिज संपत्ती दगड घेऊन जात आहे तरीसुद्धा केळगाव येथे रस्ता दुभाजक बनवत नसल्याने आज ग्रामस्थांच्या व गावातील शिवाजी आश्रम प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,व गोर सेना, ऑल इंडिया पॅथर सेना, शहिद टिपू सुलतान यांच्यावतीने निलंगा येथील उपविभागीय अधिकारी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग निलंगा उस्मानाबाद यांना निवेदन देऊन लवकरात लवकर केळगाव येथील विद्यार्थी संस्था व रहदारीचा लोकसंख्येचा विचार करून रस्ता दुभाजक करण्यात यावा अन्यथा आंदोलन उपोषण करण्यात येईल असा या संघटनेने इशारा दिला आहे. केळगाव गावावरून लातूर ते जहीराबाद महामार्गाचे काम हे पूर्ण होत आहे. परंतु अद्याप केळगाव पाटी स्त्यावर रस्ता दुभाजक फुटपाथ याची व्यवस्था महामार्ग कंपनीच्या वतीने करण्यात आली नाही. केळगाव हे पाच हजार लोकसंख्या असलेल्या वस्तीचे गाव असून पंचायत समिती गण आहे. या चौकातून निटुर, निलंगा, राठोडा, खडक उमरगा अशा चार गावाला रस्ता जातो महत्त्वाचा चौक असल्यामुळे व गावात चार शिक्षण संस्था व आश्रम शाळा आहे.
१)आनंद मुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
२) शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा
३) शारदामाता प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल
४) हंबीर बाबा साहेब उर्दू स्कूल
५) जिल्हा परिषद शाळा, केळगाव
असे गावामध्ये पाच शाळा असून परिसरातील राठोडा बुजरुकवाडी, कलांडी, निटूर, डांगेवाडी, लांबोटा, झरी, काटेजवळगा, जाजनुर, बस्पूर, खडक उमरगा या गावच्या विद्यार्थ्यांचा लोंढा शिक्षणासाठी व दहावी बारावी परीक्षा केंद्रासाठी केळगाव या गावाला आहे. दररोज हजारो विद्यार्थी केळगावला शिक्षणासाठी येत असतात व गावात आश्रम शाळा ही आहे. त्यामुळे केळगाव पाठीवर नेहमी विद्यार्थ्यांची ये-जा असते परंतु ठेकेदाराच्या वतीने महामार्गावर रस्ता दुभाजक फूटपाथ व नाल्याचे काम झाले नाही यामुळे विद्यार्थी व गावकरी यांना रस्ता पार करत असताना वाहतुकीचा अपघातात सामना करावा लागणार आहे. ते विद्यार्थ्यांसाठी अतिशय धोकादायक असू शकते यामुळे वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन होऊ शकते यामुळे संबंधित महामार्ग कंपनीने आमच्या गावचा रस्ता दुभाजक फुटपाथची व्यवस्था करून विद्यार्थ्यांची होणारी अडचण व भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी रस्ता दुभाजक ची आवश्यकता आहे. असे आशेचे निवेदन ग्रामस्थ व विविध संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समितीचे लातूर जिल्हा अध्यक्ष रमेश लांबोटे, शेरे हिंद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, गोर सेनेचे तालुकाध्यक्ष आकाश राठोड, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, एम आय एम चे निलंगा तालुका अध्यक्ष सय्यद शाहरुख, ऑल इंडिया पँथर सेनेचे लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मेघराज जेवळीकर, विकास सूर्यवंशी, व केळगाव ग्रामस्थ डी एन कांबळे, भरत चव्हाण, रावसाहेब मुगळे, रावण कांबळे, किसन पाटील, प्रकाश सूर्यवंशी, किशोर कांबळे,शंकर चव्हाण, सुनील राठोड अनिल राठोड, बालाजी कांबळे, पत्रकार जावेद मुजावर आधी जण उपस्थित होते.

0 Comments