औशात हिरेमठ संस्थानचा शिवनाम सप्ताह सुरू
बी डी उबाळे
औसा: औसा येथील वीरशैव समाजाचे लिंगैक्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी 70 वर्षे चालविलेल्या आषाढ मासी वार्षिक उत्सवातील शिवनाम सप्ताहाची परंपरा आजतागायत सुरू आहे. ष ब्र डॉ श्री 108 शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थांनचे पीठाधीपती ष ब्र श्री 108 निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली अखंड शिवनाम सप्ताह दि. 29 जुलै 2021 पासून सुरू झाला आहे. सप्ताह कालावधीत नित्य महारुद्राभिषेक, शिवपाठ, सिद्धांत शिखामणी तत्त्वामृत ग्रंथाचे पारायण, शिवभजन, शिवकीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिरेमठ संस्थानच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमा सोबतच अध्यात्म ज्ञानाची शिकवण दिली जाते, वीरशैवाचे अध्यात्मिक शक्ती केंद्र म्हणून संस्थानची ओळख निर्माण झाली आहे. आषाढ मासी वार्षिक उत्सवानिमित्त प्रतिवर्षी होणारा शिवदीक्षा सोहळा दि. 4 ऑगस्ट 2021 रोजी कोरोना संकटामुळे कोरोना नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे. शिवदीक्षा सोहळ्यानिमित्त नागणसूर, होटगी, जिंतूर येथील मठाचे शिवाचार्य भाविक भक्तांना आशीर्वाचणाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. दि. 5 ऑगस्ट 2021 रोजी महाप्रसादाने शिवनाम सप्ताहाची सांगता होणार आहे, तरी भाविक भक्तांनी कोरोना नियमाचे पालन करून कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष मुक्ता यांनी केले आहे.

0 Comments